नोकरी मिळवताना १ ) जॉब कन्सल्टन्ट
नोकरी मिळवताना १ ) जॉब कन्सल्टन्ट नोकरी संबंधी क्षेत्रात नोकरी केल्यामुळे अनेकांनी नोकरी मिळवण्यासाठी काय काय करावे लागते हे मला अनेक लोकांनी विचारले . स्वत: वर हि नोकरी शोधायचा प्रसंग अनेकदा आल्याने अजून भरपूर अनुभव हि होताच. अगदी चांगल्या संस्थेत शिक्षण झाले तरी नोकरी कशी शोधावी हे कोठेच शिकवले जात नाही. त्यामुळे अनेक गोष्टी चुकत माकतच शिकाव्या लागल्या. त्या साठी काही लेखांची मालिका लिहिण्याचा विचार आहे . ( या लेखा मध्ये अस्थानी लेखक - हेमंत वाघे असे येईल - हा माझा वॉटरमार्क असेल. ) जॉब कन्सल्टन्ट / रिक्रुटिंग एजंट / प्लेसमेंट कन्सल्टन्सी / सर्च कन्सल्टन्ट नोकरी मिळवून देण्याचे काम आजकाल जॉब कन्सल्टन्ट / रिक्रुटिंग एजंट / प्लेसमेंट कन्सल्टन्सी / सर्च कन्सल्टन्ट कडून केले जाते . इतरही काही शब्द आहेत . आपण याला कन्सल्टन्ट असा शब्द वापरूया. या व्यवसाया विषयी आणि या लोका विषयी बरेच गैरसमज झाले आहेत आणि पसरवले जात आहेत . मी स्वात: या क्षेत्रात ३ काम वर्षे केले असल्याने या विषया वरून सुरुवात करीत आहे . कोठल्याही कम्पनी मध्ये नोकरी देण...